पुढील बातमी

Kia Seltos भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

HT मराठी टीम, नवी दिल्ली
बहुप्रतिक्षित सेल्टॉस लाँच
दक्षिण कोरियाई कंपनी हुंडाई मोटर्सच्या मालकीची कंपनी किया मोटर्सने भारतात आपली पहिली कार किया सेल्टॉस लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात किया सेल्टोसची प्रतीक्षा होती. (PTI-Photo)
सुमारे ६००० हून अधिक जणांनी केलं बुकिंग
कंपनीने यापूर्वीच सेल्टॉसचे बुकिंग सुरु केले होते. दि. १६ जुलैपासून सेल्टॉसचे बुकिंग सुरु झाले होते. आतापर्यंत ६००० हून अधिक लोकांनी सेल्टॉसचे बुकिंग केले आहे. (ANI-Photo)
भारतीय वाहन उद्योगातील नवीन स्पर्धक
किया सेल्टॉसची किंमत ९.६९ लाखांपासून सुरु होते. या गाडीची टक्कर हुंडाई क्रेटा, टाटा हॅरिअर, एमजी हेक्टर, निस्सान किक्स, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० सारख्या मॉडेल्सशी असेल. या कारच्या किंमती या १० ते २० लाखांदरम्यान आहे. तर किया सेल्टॉसची किंमत ९.६९ रुपयांपासून १५.९ लाखांपर्यंत आहे. (Photo-Ex-showroom PAN India)
किया सेल्टॉस कॉम्पॅक्ट एसयूव्ही
सेल्टॉस दोन व्हेरियंट टेक लाइन आणि जीटी लाइनमध्ये बाजारात येत आहे. हे दोन्ही व्हेरियंट ५ सब-व्हेरियंटसह येतील.किया सेल्टॉस कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. यात अनेक सेगमेंट फर्स्ट फिचर मिळतील. या यादीत साइड आणि कर्टन एअरबॅग, ३६० डिग्री कॅमेरा, ब्लाईंड व्ह्यू मॉनिटर सिस्टिम, हेडअप डिस्प्ले आणि क्रूझ कंट्रोल सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. (PTI-Photo)
आकर्षक फिचर्स
किया सेल्टॉसचे टॉप मॉडेल जीटीएक्स प्लस डिझेल ऑटोमॅटिकमध्ये काही बदल पाहायला मिळतील. या यादीत फ्रंट ग्रिलवर जीटी बॅजिंग, फॉक्स स्किड प्लेट, साईड सिल आणि ब्रेक क्लिपवर रेड हायलायटर आदींचा समावेश आहे. जीटीएक्स प्लसच्या केबिनमध्ये स्टेअरिंग व्हिल, सीट आणि गियर नॉबवर लाल रंगाची स्टिचिंग दिली जाईल. (ANI-Photo)