पुढील बातमी

केरळमध्ये भारतातील पहिल्या हत्ती पुनर्वसन केंद्राची स्थापना

HT मराठी टीम , केरळ
हत्ती पुनर्वसन केंद्र
तिरुवनंतपुरम येथे देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कप्पूकडू येथे हे केंद्र असणार आहे. केरळ सरकारने या केंद्राची स्थापना केली. (छाया सौजन्य : विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
हत्ती पुनर्वसन केंद्र
हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये हत्ती संग्रहालय, प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सेवानिवृत्तीचे घर, प्राण्यांसाठी स्मशानभूमी असणार आहे. त्याचसोबत याठिकाणी अनाथ, जखमी आणि वृध्द हत्तीना घर मिळणार आहे. (छाया सौजन्य : विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
हत्ती पुनर्वसन केंद्र
पहिल्या टप्प्यासाठी 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या प्रकल्पाचे गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पी विजयन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (छाया सौजन्य: विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
हत्ती पुनर्वसन केंद्र
या केंद्रामध्ये केअरटेकर अनाथ आणि सोडलेल्या हत्तींची उत्तम काळजी घेतात तसंच ते हत्तींना अंघोळ देखील घालतात. (छाया सौजन्य : विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
हत्ती पुनर्वसन केंद्र
केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात जवळपास 65 हेक्टर जमिनीवर हे केंद्र तयार करण्यात येत आहे. पर्यटक या केंद्राला भेट देऊ शकतात तसंच त्यांना हत्ती सफारी देखील करता येणार आहे. (छाया सौजन्य : विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
हत्ती पुनर्वसन केंद्र
हे केंद्र श्रीलंकेतील पिन्नवाला हत्ती अनाथाश्रमासारखेच असणार आहे. या केंद्रामध्ये आतापर्यंत फक्त 15 हत्ती आहेत. या केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हत्तींची संख्या वाढवण्यात येणार आहे. (छाया सौजन्य : विवेक नायर / हिंदुस्तान टाईम्स)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kerala government set to house Indias first elephant rehabilitation center