पुढील बातमी

PHOTO: केरळमधील पूरस्थिती गंभीर

हिंदुस्थान टाइम्स , मुंबई
केरळ पूर
महाराष्ट्रापाठोपाठ केरळलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे केरळमध्ये महापूर आला आहे. पूरामुळे गावंच्या गावं पाण्याखाली गेली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पूरामध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. (छाया सौजन्य : व्ही. शिवराम/ हिदुस्थान टाइम्स)
केरळ पूर
मुसळधार पाऊस आणि पूराचा सर्वात जास्त फटका कोची येथे बसला आहे. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, मच्छिमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. (छाया सौजन्य : व्ही. शिवराम/ हिदुस्थान टाइम्स)
केरळ पूर
केरळमधील त्रिशूर, वायनाड, कन्नूर, पलक्काड आणि कासरगोड येथे पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (छाया सौजन्य : एएनआय)
केरळ पूर
केरळमधल्या मलाप्पूरम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहे. पूरामुळे अनेक नागरिक घरामध्ये अडकले आहेत. एनडीआरएफचे जवान दोरीच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. (छाया सौजन्य : एएनआय)
केरळ पूर
वायनाड जिल्ह्यातील बनासुरासागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. वायनाडमधून २० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. याठिकाणी २६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (छाया सौजन्य : एएनआय)
केरळ पूर
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी मंदिरामध्ये शिरल्यामुळे भाविक अडकून पडले आहेत. त्यांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. (छाया सौजन्य : हिदुस्थान टाइम्स)