पुढील बातमी

जल्लोष विजयाचा !

HT मराठी टीम, मुंबई
जल्लोष विजयाचा !
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी मार्गाची पटरी बदलून मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अवघ्या एका धावेनं सामना जिंकला. (छाया सौजन्य : कुणाल पाटील)
जल्लोष विजयाचा !
चेन्नई सुपर किंग्जला निर्धारित २० षटकात ७ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. लसिथ मलिंगाने या सामन्यात केवळ एकच विकेट घेतली असली तरी तोच मुंबई इंडियन्सच्या विजयाचा खरा हिरो ठरला. (छाया सौजन्य : कुणाल पाटील)
जल्लोष विजयाचा !
हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यावर आपल्या विजयाची मुद्रा उमटवून मुंबई इंडियन्सची टीम मुंबईत परतली. (छाया सौजन्य : अंशुमान पोयरेकर )
जल्लोष विजयाचा !
मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन सोमवारी रात्री करण्यात आलं होतं. (छाया सौजन्य : अंशुमान पोयरेकर )
जल्लोष विजयाचा !
मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली असून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक होती. (छाया सौजन्य : अंशुमान पोयरेकर )
जल्लोष विजयाचा !
विजेत्या संघाला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी मुंबई इंडियन्सच्या फॅननं केली होती केली होती. (छाया सौजन्य : अंशुमान पोयरेकर )