पुढील बातमी

PHOTOS : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा

HT मराठी टीम , पुणे
कसबा गणपती
पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.पुण्यातील पाच मानाच्या गणपतीपैंकी पहिला गणपती म्हणजे श्री कसबा गणपती होय.
तांबडी जोगेश्वरी
कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरी हा पुण्यातील दुसरा मानाचा गणपती होय. कसबा गणपतीप्रमाणेच १८९३ पासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
गुरुजी तालीम मंडळ
गुरुजी तालीम मंडळचा गणपती हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती होय. गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशोत्सवास १८८७ मध्ये सुरुवात झाली.
तुळशीबाग
पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबागेतला गणपती होय. १९०० मध्ये या गणेशोत्सवास प्रारंभ झाला. इथल्या देखाव्यांसाठी हा गणपती प्रसिद्ध आहे.
केसरीवाडा
केसरीवाडा गणपती हा पुण्यातील पाचवा मानाचा गणपती होय. १८९४ पासून गणेशोत्सावास सुरूवात झाली. विविधरंगी फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामध्ये गणेशाची मूर्ती विराजमान