पुढील बातमी

PHOTO: बिहारमध्ये पाऊस थांबला मात्र पूरस्थिती कायम

हिंदुस्थान टाइम्स , बिहार
बिहार पूर
बिहारमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पूराने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
बिहारमध्ये पूराने आतापर्यंत ४० जणांचा बळी घेतला आहे. तर ९ जण जखमी झाले आहेत. (फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
बिहारमधील शहरापासून ते गावापर्यंत ठिकठिकाणी ७ ते ८ फुटांपर्यंत पाणी साचले आहे. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. (फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफची टीम सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करत आहे. आतापर्यंत ३७ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.(फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
एनडीआरएफच्या २२ टीमकडून बचावकार्य सुरु आहे. ३५ बोटी, ७५ टॅक्टर आणि १० बस, तसंच वायूदलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देखील बचावकार्य सुरु आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत खाद्य पदार्थांची पाकिटं आणि पाणी पोहचवले जात आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)
बिहार पूर
अतिवृष्टी आणि पूरामुळे बिहारमधील शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)