पुढील बातमी

PHOTOS : मराठी सेलिब्रिटींचे 'कपल गोल्स'

HT मराठी टीम , मुंबई
मराठी सेलिब्रिटींचे 'कपल गोल्स'
मराठी सिने, नाट्य आणि मालिकासृष्टीत अनेक मराठी सेलिब्रिटी जोड्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या जोड्या मराठी चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. चला तर पाहू या जोडप्यांचे काही खास फोटो.
मराठी सेलिब्रिटींचे 'कपल गोल्स'
तरुणांमध्ये सिद्धार्थ- मिताली जोडी खूपच लोकप्रिय आहे. या दोघांनी गेल्यावर्षी साखरपुडा केला. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
ईशा केसस्कर- ऋषी सक्सेना
'जय मल्हार', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील ईशा केसकर आणि 'काहे दिया परदेस' मधला ऋषी सक्सेना ही जोडी खूपच लोकप्रिय आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
सई गोखले - सुव्रत जोशी
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या मालिकेनंतर दोघंही विवाहबंधनात अडकले. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
प्रिया बापट- उमेश कामथ
रुपेरी पडद्यावर आणि प्रत्यक्षातही प्रिया आणि उमेशची जोडी मराठी प्रेक्षकांच्या खूपच आवडीची आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)
वीणा जगताप- शिव ठाकरे
बिग बॉस २ च्या घरात वीणा जगताप आणि शिव ठाकरे ठाकरेच्या प्रेमाची कळी फुलली. या दोघांनी एकमेकांवरचं प्रेम कार्यक्रमात मान्यही केलं. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)