पुढील बातमी

PHOTOS : दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या हत्तिणीची असा लावला छडा

HT मराठी टीम , मुंबई
लक्ष्मी हत्तीण
गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लक्ष्मी हत्तिणीचा शोध घेण्यास दिल्लीच्या वनविभागास यश आलंय. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
वन विभागानं यमुना खादर भागातून या हत्तिणीची सुटका केली आहे.(Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
वन विभागानं यमुना खादर भागातून या हत्तिणीची सुटका केली आहे.(Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
हत्तीचे मालक त्यांची योग्य देखभाल करत नाही असा आरोप एका प्राणीप्रेमी संस्थेनं केला होता. त्यानंतर हत्तींच्या मालकांना त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची योग्य सोय करावी असं हायकोर्टानं सांगितलं. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
त्यानंतर पाच पैकी एकूण चार हत्तीची गुजरात आणि राजस्थानमध्ये सोय करण्यात आली. मात्र पाचवी हत्तीण लक्ष्मीचा ताबा घेण्यासाठी वनविभाग पोहोचला तेव्हा हत्तीच्या मालकानं ताबा देण्यास नकार दिला. (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
जुलै महिन्यात हत्तिणीचा मालक आणि वनविभागाच्या टीमध्ये वाद झाला. त्यानंतर हत्तिणीचा मालक गेल्या दोन महिन्यांपासून हत्तिणीला घेऊन लपून होता.(Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
लक्ष्मी हत्तीण
मालकानं हत्तिणीला लपवून ठेवल्याचं कळताच वनविभागाची टीम कामाला लागली. अखेर दोन महिन्यांनंतर वनविभागास हत्तिणीचा छडा लावण्यास यश आलं.(Photo by Raj K Raj/ Hindustan Times)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Elephant Laxmi inside the truck that will be used for its rehabilitation after it was found by the Delhi forest department