पुढील बातमी

'ड्रीम गर्ल' चित्रपटाने तीन दिवसांत केली तुफान कमाई

लाईव्ह हिंदुस्थान , मुंबई
ड्रीम गर्ल चित्रपट
बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री नुसरत भरुचा यांच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. तीन दिवसात या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
ड्रीम गर्ल चित्रपट
'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने उरी, राझी यांसारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. तीन दिवसांत या चित्रपटाने ४४.५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
'ड्रीम गर्ल' चित्रपट
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोमवारी एक ट्विट करत 'ड्रीम गर्ल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असल्याचे सांगत कमाईचे आकडे जारी केले आहेत. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
ड्रीम गर्ल चित्रपट
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.०५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी १६.४४ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी १८.१० कोटींची कमाई केली. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
ड्रीम गर्ल चित्रपट
ड्रीम गर्ल चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता आयुष्मान देखील आनंदी झाला आहे. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
ड्रीम गर्ल चित्रपट
समिक्षकांनी दिलेल्या चांगल्या रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. (फोटो सौजन्य: यूट्यूब)
ड्रीम गर्ल चित्रपट
अभिनेता आयुष्मानने ड्रीम गर्ल चित्रपटाला एक पैसे वसूल चित्रपट असे म्हटले आहे. (फोटो सौजन्य: यूट्यूब)