पुढील बातमी

PHOTOS: दिल्लीकरांबरोबरच विदेशी पर्यटकही प्रदूषणाने हैराण

HT मराठी टीम , दिल्ली
दिल्ली प्रदूषण
दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंद झाली आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
दिल्ली प्रदूषण
हरियाणा आणि पंजाबमध्ये पिकांचे अवशेष जाळल्यामुळे आणि दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा दर्जा आणखी खालवला आहे. (फोटो सौजन्य: अमल के. एस/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्लीतील प्रदूषण
वाढत्या प्रदूषणाचा फटका दिल्लीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. (फोटो सौजन्य: अमल के. एस/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
दक्षिण दिल्ली शहरातील महरोली भागामध्ये असलेले कुतुब मीनार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावले आहे. (फोटो सौजन्य: अमल के. एस/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
दिल्लीतील वाढते प्रदूषण पाहता सोमवारपासून दिल्लीमध्ये सम-विषम योजना पुन्हा लागू करण्यात आली. (फोटो सौजन्य: अमल के. एस/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
दिल्लीतील रस्त्यावर ज्या वाहनांच्या अखेरीस ०, २, ४, ६, ८ हा क्रमांक असेल तीच वाहने धावणार आहेत. (फोटो सौजन्य: रजक राज/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
सम-विषम योजनेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ४ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. (फोटो सौजन्य: रजक राज/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
'सम-विषम योजनेचे पालन करा आणि प्रदूषण दूर करा' असे पोस्टर्स दिल्लीमध्ये वाहतूक पोलिस दाखवत आहेत. (फोटो सौजन्य: रजक राज/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
दिल्ली पोलिसांकडून देखील वाहतुकींचे नियम पाळा असे आवाहन करण्यात येत आहे. (फोटो सौजन्य: रजक राज/ हिंदुस्थान टाइम्स)
दिल्ली प्रदूषण
दिल्ली-एनसीआर पसिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. (फोटो सौजन्य: रजक राज/ हिंदुस्थान टाइम्स)