पुढील बातमी

कोरोना : स्पेनमधल्या रस्त्यावर राहणाऱ्यांचे भयावह अनुभव

वृत्तसंस्था, बार्सिलोना
स्पेन
कोरोना विषाणूनं चीननंतर इटली, स्पेन, जर्मनीत थैमान घातलं आहे. स्पेनही लॉकडाऊन असून इथे लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. लोक घरातच थांबले आहेत, मात्र इथल्या बेघरांचा प्रश्न गंभीर आहे. (AFP)
स्पेन
कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत स्पेन हा सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावर आहे. (AFP)
स्पेन
३६ वर्षीय घाना ८ वर्षांपासून बार्सिलोनाच्या रस्त्यावर राहत आहे, कोरोनामुळे लोकांना घरात थांबण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र ज्यांच्या डोक्यावर छत नाही त्यांनी काय करायचं असा प्रश्न त्यानं विचारला आहे. (AFP)
स्पेन
५ वर्षांपासून स्पेनच्या रस्त्यावर राहणाऱ्या जो नं गरीबांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात राहायला नकार दिलाय तिथे कोरोनाची बाधा झाली तर अशी भीती त्याला वाटतेय. त्यामुळे दुकानाच्या कडेला रस्त्यावरच झोपण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. तो म्हणतो मी इथे जास्त सुरक्षित आहे. (AFP)
स्पेन
हा आफ्रिकेतून स्पेनमध्ये आलेला निर्वासित आहे. त्याला राहायला घर नाही. रस्ते पूर्ण रिकामी असल्यानं तो इथल्या बाकड्यांवर बसून दिवस ढकलत आहे. (AFP)
स्पेन
३२ वर्षीय रॉड्रीको म्हणतो माझं उभं आयुष्य रस्त्यावर गेलं मात्र आयुष्यात पहिल्यांदा मला भीती वाटू लागली आहे. ही भीती कोरोनाची नाही तर रस्त्यावर पसरलेल्या भयाण शांततेची आहे. (AFP)