पुढील बातमी

PHOTOS: चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर

HT मराठी टीम , मुंबई
कोरोना विषाणू
चीनच्या विविध प्रांतांमध्ये प्राणघातक कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. या विषाणूने आतापर्यंत ८० जणांचा बळी घेतला आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
सोमवारी सकाळपर्यंत या प्राणघातक विषाणूमुळे ८० जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ७६ जण एकट्या हुबेई प्रांतातील आहेत. हुबेई प्रांतातह १,४२३ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
याशिवाय चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या २,४५४ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. तर जगभरात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्या २,५०४ वर पोहचली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
हाँगकाँगमध्ये ६, मकाऊमध्ये ५, तैवानमध्ये ३ आणि आशियाई भागांमध्ये २४ रुग्णांना या विषाणूची लागण झाली आहे. तर युरोपमध्ये ३ आणि उत्तर अमेरिकामध्ये ५ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची पहिली घटना उघडकीस आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूने चीनमध्ये रौद्ररूप धारण केले. या विषाणूने ८० जणांचा बळी घेतला आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणूंमुळे मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Photo-REUTERS)