पुढील बातमी

PHOTOS: चीनमध्ये कोरोनाने घेतला २१२ जणांचा बळी

HT मराठी टीम , मुंबई
कोरोना विषाणू
चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने आतापर्यंत २१२ जणांचा बळी घेतला आहे. तर जवळपास ९ हजार ६९२ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये पसरलेला कोरोना विषाणू आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोनाची सर्वाधिक लागण चीनमधील वुहान प्रांतात झाली आहे. पण आता १७ देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
वुहान प्रांतामध्ये आणखी १२०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत ९००० रुग्ण कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोनाच्या विषयावर चीनने सांगितले की, प्रत्येक देशाने जबाबदारीने वागले पाहिजे. आवश्यक काळजी घेतली पाहिजे. पण कोणीही अति करू नये ज्यामुळे या आजाराबद्दल लोकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होईल. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
भारतासह २० देशांमध्ये कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणूशी लढा देण्याचे काम अजूनही चीनमध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. (Photo-REUTERS)