पुढील बातमी

PHOTOS: कोरोनाच्या धास्तीमुळे 'मास्क' उत्पादन वाढले

HT मराठी टीम, दिल्ली
मास्क तयार करण्याचे काम सुरु
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. त्यामुळे देशात मास्कच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. (Photo-AFP)
मास्क तयार करण्याचे काम सुरु
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व जण मास्कचा वापर करत आहे. बाजारात देखील मास्कचा तुटवडा आहे. अशामध्ये काही ठिकाणी मास्क दुप्पट किमतीला विकले जात आहे. (Photo-AFP)
मास्क तयार करण्याचे काम सुरु
याच दरम्यान, राजधानी दिल्लीतील मुस्तफाबाद आणि खजूरी भागामध्ये घरातच मास्क तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. (PTI-Photo)
मास्क तयार करण्याचे काम सुरु
याठिकाणी स्वस्त किमतीमध्ये मास्क तयार केले जात आहे. जेणेकरुन सामान्यांना ते खरेदी करता येतील. (Photo-AFP)
मास्क तयार करण्याचे काम सुरु
या भागामध्ये दिवसाला लाखो मास्क तयार केले जातात. (PTI-Photo)
मास्क तयार करण्याचे काम सुरु
कोरोना विषाणूमुळे भारतात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १४८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. (PTI-Photo)