पुढील बातमी

PHOTOS: चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरुच, आतापर्यंत ९०२ जणांचा बळी

HT मराठी टीम , मुंबई
कोरोना विषाणू
चीनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने आतापर्यंत ९०२ नागरिकांचा बळी घेतला आहे. ४० हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणूमुळे चीनमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहेच. त्याचसोबत जगभरातील जनतेची चिंता देखील वाढली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणूमुळे रविवारी ९७ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ मृत वुहानमधील आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
रविवारी ४ हजार ८ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामधील २९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे एअर इंडिया आणि इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी विमानसेवा रद्द केली आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
कोरोना विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना चीनमध्ये विशेष पथक पाठवणार आहे. (Photo-REUTERS)
कोरोना विषाणू
सोमवारी ते मंगळवारपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष पथकाचे प्रमुख चीनमध्ये रवाना होतील त्यानंतर इतर सदस्य याठिकाणी पोहचतील. (Photo-AP)