पुढील बातमी

PHOTOS : मलायका आणि क्रितीचा रॅम्पवर ग्लॅमरस अंदाज

लाइव्ह हिंदुस्थान, दिल्ली
मलायका अरोरा
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आज जरी चित्रपटामध्ये काम करत नसली तरी देखील तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकने अनेकांना प्रेरणा मिळते. ४५ वर्षांची मलायका या वयातही फिट आणि ग्लॅमरस आहे. यामुळे आजही तिचा मोठा चाहता वर्ग आहेत. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम)
मलायका अरोरा
मलायका तिच्या इन्स्टाग्रामवर जे काही शेअर करते ते अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल होते. त्याला प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स मिळतात. याच दरम्यान मलायकाचे काही सुंदर फोटो समोर आले आहे. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम)
मलायका अरोरा
दिल्लीमध्ये 'एफडीसीआई इंडिया कॉचर वीक २०१९' हा फॅशन शो सुरु आहे. या शोमध्ये मलायका रॅम्पवॉक करताना दिसली. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम)
मलायका अरोरा
या फॅशन शोमध्ये मलायका खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. ती हिरव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. मलायकाचा हा लेहेंगा प्रसिध्द डिझायनर सुलक्षणा मोंगा यांनी तयार केला आहे. (छाया सौजन्य इन्स्टाग्राम)
अभिनेत्री क्रिती सनॉन
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन सुध्दा सहभागी झाली होती. (छाया सौजन्य एएफपी)
अभिनेत्री क्रिती सनॉन
यावेळी अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या गोल्डन लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. (छाया सौजन्य एएफपी)
अभिनेत्री क्रिती सनॉन
क्रिती सनॉन या शोमध्ये तिचा लेहेंगा डिझाइन केलेल्या श्यामल आणि भूमिका यांच्यासोबत रॅम्पवर उतरली. (छाया सौजन्य एएफपी)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bollywood actress malaika arora and kriti sanon ramp walk during fdci india couture week 2019