पुढील बातमी

Photos : निवृत्तीनंतर पुन्हा खेळावे असा विचार करणारा रायडू एकटा नाही!

HT मराठी टीम, नवी दिल्ली
रायडूशिवाय या खेळाडूंनी निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन केले होते.
रायडूशिवाय या खेळाडूंनी निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन केले होते.
झिम्बब्वेच्या ब्रेंडन टेलरने २०१५ मध्ये निवृती जाहीर केली. त्यानंतर नॉटिंगमशायरशी करारबद्धही झाला. द
झिम्बब्वेच्या ब्रेंडन टेलरने २०१५ मध्ये निवृती जाहीर केली. त्यानंतर नॉटिंगमशायरशी करारबद्धही झाला. दोन वर्षानंतर म्हणजे २०१७ मध्ये तो पुन्हा झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघात परतला होता.
स्टीव्ह टिकोलो (छाया सौजन्य यूट्यूब)
निवृत्तीनंतर वयाच्या ४२ व्या वर्षी पुन्हा संघात परतण्याचा विक्रमी निर्णय केनियाच्या स्टीव्ह टिकोलोच्या नावावर आहे. विशेष म्हणजे संघ व्यवस्थापनाच्या विनंतीवरुन तो पुन्हा संघात परतला होता. त्यानंतर २३ जानेवारी २०१४ मध्ये तो नेदरलँडविरुद्ध अखेरचा सामना खेळला.
केविन पीटरसन
इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने २०११ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. काही महिन्यातच त्याने आपला निर्णय बदलला.
कार्ल हूपर (छाया सौजन्य यूट्यूब)
१९९९ च्या विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर कार्ल हूपर यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर २००१ मध्ये पुन्हा पुनरागमन करत २००३ च्या विश्वचषकात संघाचे नेतृत्वही केले.
इम्रान खान
निवृत्तीनंतर पुन्हा यशस्वी पुनरागमन करणाऱ्या खेळाडूमध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान अव्वलस्थानी आहेत. १९८७ मध्ये क्रिकेटला अलविदा केल्यानंतर पाकचे तत्कालीन राष्ट्रपती झिया उल हक यांच्या विनंतीनंतर वयाच्या ३९ वर्षी इम्रान खान यांनीपुनरागमन केले. १९९२ मध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये पाकने विश्वचषकही उंचावला होता.
जावेद मियादाद
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जावेद मियादाद यांनी १९९६ चा विश्वचषक खेळण्यासाठी संघात पुनरागमन केले होते.
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Ambati Rayudus not First Cricketer U turn After retirement See List With Phot cricketers who came out of retirement