पुढील बातमी

मराठवाड्यातील ९० टक्के भागात तीव्र दुष्काळ

मराठी वेब टीम, औरंगाबाद
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
जालना जिल्ह्यातील मार्डी गावामध्ये बोअरवेलमधून पाणी उपसून हंड्यात भरण्यासाठी उभी असलेली ज्येष्ठ महिला. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रताही जाणवू लागली आहे. या भागातील लोकांसाठी दुष्काळ नवा राहिलेला नाही. पण त्यातून कधी सुटका होणार, हे मात्र त्यांना माहिती नाही. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
किमान पिण्याचे पाणी तरी आणावेच लागणार, यासाठी नंदी गावातील या तरुणी रोज दोन किलोमीटरची पायपीट करतात. डोक्यावर हंडा घेऊन रखरखत्या उन्हात त्यांना विहिरीमधून उपसून पाणी आणावे लागते. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
नंदी गावातील विहिरीतील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. तरीही शिल्लक असलेले पाणी उपसून काढण्यासाठी या विहिरींभोवती रोजच महिलांची गर्दी होते. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्येच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण अद्याप या भागातील अनेक गावांतील लोकांना दुष्काळ निवारणासाठी लागणारी सरकारी मदत मिळालेली नाही. राज्यातील एकूण २६ जिल्ह्यातील २० हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
पिण्याचे पाणी तरी मिळावे, यासाठी गावातील विहिरीभोवती जमलेल्या महिलांसाठी शेख इब्राहिम आधारस्तंभ आहेत. ते स्वतः विहिरीमध्ये उतरून शिल्लक असलेले पाणी महिलांना त्यांच्या हंड्यामध्ये भरून देतात.
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
दुष्काळग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणी पुरवले जाईल आणि चारा छावण्या उभारल्या जातील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण अनेक गावांमध्ये टँकर येत नाहीत. ज्या विहिरींमध्ये गाळ भरला आहे. तेथील पाणी पिण्यासाठी योग्य आहे, असे सरकार कसे काय म्हणू शकते, असा प्रश्न अस्लम पटेल यांनी उपस्थित केला. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
मराठवाड्यातील कर्जत गावातील विहीर ग्रामस्थानी तब्बल २७ वर्षांनी गाळ काढून स्वच्छ केली. आता या विहिरीत सरकारी टँकरमधील पाणी सोडण्यात येत असून, ते ग्रामस्थांना पुरविण्यात येणार आहे. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नाही. तर मराठवाड्यातील औरंगाबाद या महत्त्वाच्या शहरामध्येही चार दिवसांतून एकदाच नळाला पाणी येते. (छायाचित्र - प्रतिक चोरगे)
  • Marathi News संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:90 percent of Marathwada in drought 100 percent apathy claim residents