पुढील बातमी

PHOTO: ८ अपाचे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

लाईव्ह हिंदुस्थान , दिल्ली
अपाचे हेलिकॉप्टर
भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे. कारण भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मंगळवारी अपाचेची ८ लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट हवाई तळावर भारतीय वायूदलाची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी अमेरिका निर्मित ८ 'अपाचे एएच- ६४ ई' लढाऊ हेलिकॉप्टर आज दाखल झाले. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
अपाचेची ८ लढाऊ हेलिकॉप्टरची पुजा करुन ते हवाई दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले. यासह अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाण करणारा भारत जगातील १६ वा देश बनला आहे. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
अपाचे एएच ६४ ई हे सध्याचे जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ पद्धतीचे हेलिकॉप्टर आहे. खुद्द अमेरिकेकडून याच हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
अपाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात दाखल होणार असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद नक्कीच वाढणार आहे, अशी माहिती हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
या हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकी सरकार आणि बोईंग कंपनीशी करार करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: पीटीआय)
अपाचे हेलिकॉप्टर
एकूण २२ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात टप्याटप्याने दाखल होणार आहेत. याआधी चार अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. (फोटो सौजन्य: पीटीआय)