पुढील बातमी

PHOTO: जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळाचा हाहाकार

HT मराठी टीम , दिल्ली
जपानमध्ये चक्रीवादळ
जपानमध्ये 'हगीबिस' चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळामुळे जपानमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
गेल्या ६० वर्षातील हे सर्वात शक्तीशाली वादळ असल्याची माहिती सांगितली जात आहे. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना लष्कर, अग्निशमन दल, आपत्ती निवारण पथकांकडून सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु आहे. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
चक्रीवादळानंतर आलेल्या पावसामुळे जपान जलमय झाले आहे. पूराचे पाणी शहरासह गावांमध्ये शिरल्यामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
वादळामुळे १ हजार २८३ घरांचे नुकसान झाले आहे. तर ५१७ घरं पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
चक्रीवादळ आणि पावसामुळे आतापर्यंत ७३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Photo-AFP)
जपानमध्ये चक्रीवादळ
जपानच्या अनेक भागामध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर रस्ते, रेल्वे आणि हवाईसेवा देखील ठप्प झाली आहे. (Photo-AFP)