मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  G20 summit : खर्गेसोबत मोदी हास्यविनोदात रमले, काय घडलं जेव्हा ममता-केजरीवाल समोर आले..

G20 summit : खर्गेसोबत मोदी हास्यविनोदात रमले, काय घडलं जेव्हा ममता-केजरीवाल समोर आले..

Dec 06, 2022 01:21 PM IST Shrikant Ashok Londhe
  • twitter
  • twitter

All-party meeting on G20 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अनोखे दृश्य पाहायला मिळाले.  तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर व उद्धव ठाकरे वगळता सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अप्रतिम फोटोही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

पीएम मोदी काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत हास्य विनोद करताना दिसले. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल चहापानावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना कॅमेऱ्यात दिसले. पंतप्रधान मोदी हे कम्युनिस्ट पक्षाचे सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांच्याशी हितगुज करताना दिसले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उद्देश जी-२० परिषदेपूर्वी भारताची क्षमता संपूर्ण जगाला दाखवून देणे हा होता. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे G-२० अध्यक्षपद ही संपूर्ण जगाला देशाची क्षमता दाखवण्याची अनोखी संधी आहे. आज भारताबद्दल जागतिक कुतूहल आणि आकर्षण आहे, जे या संधीचे महत्त्व वाढवते. त्यांनी 'टीमवर्क'च्या महत्त्वावर भर दिला आणि विविध G-२० कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व नेत्यांचे सहकार्य मागितले. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

पंतप्रधान मोदी म्हणाले की G-२० चे अध्यक्षपद भारताच्या विविध भागांचे प्रदर्शन करण्यास मदत करेल, देशातील विविध प्रदेशांचे वेगळेपण समोर आणेल.वर्षभरातील विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने अभ्यागत भारताला भेट देण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन मोदींनी पर्यटनाला चालना देण्यावर आणि G-२० बैठका होणार असलेल्या ठिकाणांच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ममता बॅनर्जी, बिजू जनता दल (बीजेडी) नवीन पटनायक यांनी बैठकीला संबोधित केले, असे निवेदनात म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे (आप) अरविंद केजरीवाल, वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, सीपीआय-एमचे सीताराम येचुरी, तेलगू देसम पक्षाचे एन चंद्राबाबू नायडू आणि डीएमकेचे एमके स्टॅलिन यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनीही या बैठकीला संबोधित केले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होते. भारताच्या G-20 प्राधान्यक्रमांच्या पैलूंचे तपशीलवार सादरीकरण देखील करण्यात आले. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, एस जयशंकर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि भूपेंद्र यादव हेही या बैठकीला उपस्थित होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही उपस्थित होते. भारताच्या G-20 प्राधान्यक्रमांच्या पैलूंचे तपशीलवार सादरीकरण देखील करण्यात आले. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, एस जयशंकर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी आणि भूपेंद्र यादव हेही या बैठकीला उपस्थित होते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज