अॅपलने iOS १६.२ सॉफ्टवेअर अपडेट आणणे सुरू केले आहे. ज्यामुळे iPhones वर 5G वापर करण्याची प्रक्रिया सुरु करता येईल. दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स जिओने घोषित केले आहे की, पात्र आयफोन्स आजपासून जिओ ट्रू ५ जी सेवा सुरू होईल. तुमच्या अॅपल आयफोनवर नवीनतम जनरेशन नेटवर्क सेवा वापरणे सुरू करण्यासाठी येथे दिलेल्या स्टेप्स फाॅलो करा.
(1 / 8)
5G वापरणे सुरू करण्यासाठी तुम्ही तुमचा iPhone iOS 16.2 वर अपडेट करणे आवश्यक आहे.
(2 / 8)
असे करण्यासाठी, तुमच्या आयफोन वरील सेटिंग्जवर जा, त्यानंतर जनरल > साॅफ्टवेअर अपडेट > डाऊनलोड अॅड इन्स्टाॅलवर टॅप करा.
(3 / 8)
लक्षात ठेवा की सर्व आयफोन 5G-सक्षम नाहीत. अॅपल आयफोन आणि त्यावरील वापरकर्ते फक्त 5G वापरू शकतात.
(4 / 8)
पात्र आयफोनच्या यादीमध्ये आयफोन १२ मिनी, आयफोन १२ प्रो , आयफोन १२ प्रो मॅक्स, आयफोन १३ मिनी, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन एसई २०२२ (३ री जनरेशन), आयफोन १४, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्सचा समावेश आहे.
(5 / 8)
तुमच्या परिसरात 5G सेवेची उपलब्धता आहे का ते तपासा. जीओ ट्रू ५ जी दिल्ली-एनसीआर, गुजरात, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे येथे उपलब्ध आहे.
(6 / 8)
वापरकर्त्यांना त्यांच्या आयफोनवर 5G सेवा सक्षम करण्यासाठी जिओकडून आमंत्रण मिळेल.
(7 / 8)
जिओ वेलकम 5G चालवण्यासाठी वापरकर्त्यांनी प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड सेवांसाठी २३९ रुपये किंवा त्याहून अधिकचा सक्रिय जिओ वैध प्लॅन असणे आवश्यक आहे.
(8 / 8)
जिओ 5G वापरणे सुरू करण्यासाठी, सेटिंग्ज > मोबाइल डेटा > व्हॉइस आणि डेटा वर जा. येथे 5G ऑटो तसेच 5G स्टँडअलोन ऑन निवडा.