अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा अभिषेक सोहळा काही तासांत सुरू होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी अनुपम खेर, रजनीकांत, कंगना रनौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अयोध्येत आधीच पोहोचले होते.
तर, आता सकाळी अमिताभ बच्चन, आलिया-रणबीर, कतरिना-विकी कौशल हे अयोध्येला रवाना झाले आहेत. यावेळी सगळ्याच अभिनेत्रींनी सुंदर गोल्डन शेड असलेल्या साड्या नेसलेल्या पाहायला मिळाल्या.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर दोघे जोडीने अयोध्येला रवाना झाले आहेत. यावेळी आलियाने हिरव्या रंगाची गोल्डन शेड असलेली साडी नेसली होती. तर, रणबीर कपूर देखील पारंपारिक धोती-कुर्ती परिधान करून दिसला.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी देखील अयोध्येला जाण्याची पूर्ण तयारी केली. यावेळी कतरिना कैफ हिने सुंदर सोनेरी साडी नेसली आहे, तर, विकी कौशल याने मोती रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला आहे.