Bollywood Most Famous Actress: आलिया भट्टपासून ते दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रापर्यंत... जाणून घ्या कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रियता मिळवत आहेत.
(1 / 8)
आलिया भट्टपासून ते दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रापर्यंत…जाणून घ्या कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रियता मिळवत आहेत.
(2 / 8)
या यादीत पहिले नाव आलिया भट्टचे आहे, जिला एकट्या इंस्टाग्रामवर ८ कोटी ५२ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘राझी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘आरआरआर’ आणि ‘गली बॉय’सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
(3 / 8)
नुकतीच आई झालेली अभिनेत्री दीपिका पादुकोण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर ८ कोटी १ लाख फॅन फॉलोअर्स आहेत. या यादीत दीपिका ही आलियाची एकमेव स्पर्धक आहे. दीपिका पादुकोणच्या सर्वात हिट चित्रपटांबद्दल बोलायचे, तर तिने ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘जवान’ आणि ‘पठाण’सारखे चित्रपट दिले आहेत.
(4 / 8)
प्रियांका चोप्रा लग्नानंतर भारत सोडून अमेरिकेत राहायला गेली असली तरी, तिचे चाहते आजही तिला भारताची देसी गर्ल मानतात. प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटांमध्ये दिसली नाही, पण देश-विदेशातील ९ कोटी १८ लाखांहून अधिक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.
(5 / 8)
‘ॲनिमल’ आणि ‘गुडबाय’ यांसारख्या चित्रपटात दिसलेली रश्मिका मंदाना हिंदी चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नसली, तरी तिची फॅन फॉलोइंग खूप झपाट्याने वाढली आहे. सध्या तिला इन्स्टावर ४ कोटी ४० लाखांहून अधिक लोक त्याला फॉलो करतात.
(6 / 8)
या यादीत पुढचे नाव क्रिती सेननचे आहे, जिला इंस्टाग्रामवर ५ कोटी ८२ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. दरम्यान, क्रिती सेननने ‘आदिपुरुष’, ‘मिमी’, ‘लुका छुपी’, ‘दिलवाले’ आणि ‘बरेली की बर्फी’सारखे चित्रपट दिले आहेत.
(7 / 8)
इन्स्टाग्रामवर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीचेही नाव पुढे आले आहे. 'शेरशाह' आणि 'कबीर सिंह' सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या कियारा अडवाणीला इंस्टावर ३ कोटी ५३ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
(8 / 8)
तापसी पन्नूने बॉलिवूडला अनेक मोठे आणि यशस्वी चित्रपट दिले आहेत. परंतु या सर्व अभिनेत्रींमध्ये तिची फॅन फॉलोइंग सर्वात कमी आहे. इन्स्टावर तिला २ कोटी लोक फॉलो करत आहेत.