Akshaya-Hardeek Makar Sankranti: पहिल्या मकर संक्रांतीसाठी अक्षया आणि हार्दिक दोघेही हलव्याचे दागिने घालून सजले होते.
(1 / 5)
नुकताच मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला होता. या निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी आपल्या घरातील मकर संक्रांती सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेत्री अक्षया देवधर हिने देखील आपल्या पहिल्या मकर संक्रातीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
(2 / 5)
अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणादा आणि पाठक बाई बनून ही जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती.
(3 / 5)
लग्नानंतर अक्षया आणि हार्दिक यांची ही पहिलीच मकर संक्रांत होती. मात्र, हार्दिक सध्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी हे फोटो थोडे उशीराने शेअर केले आहेत.
(4 / 5)
पहिल्या मकर संक्रांतीसाठी अक्षया आणि हार्दिक दोघेही हलव्याचे दागिने घालून सजले होते. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करून संक्रांत साजरी केली आहे.
(5 / 5)
अक्षया आणि हार्दिकच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी त्यांच्या कुटुंबाने घरात खास सजावट केली होती. पतंगा आणि फुलांची सजावट करून त्यांचं घर सजवण्यात आलं होतं.