असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी चित्रपटसृष्टीतून आपले जोडीदार निवडले आणि त्यांच्यासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. या जोडप्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. 2001 मध्ये अक्षय आणि ट्विंकलचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या सपोर्ट करताना दिसत आहे. पण ट्विंकलला फ्लॉप अभिनेत्री टॅग देण्यात आला असला तरी ती आज कोट्यवधी रुपये कमावते.
१९९५ मध्ये बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ट्विंकलचे करिअर फारसे चांगले राहिले नाही. ट्विंकलचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आणि त्यानंतर अभिनेत्रीने नवीन करिअर निवडले आणि त्यात यश मिळवले. ट्विंकल एक इंटिरियर डिझायनर, निर्माता आणि लेखिका देखील आहे.
ट्विंकलने २००२ मध्ये तिचे इंटिरियर डिझायनर स्टोअर सुरू केले. या स्टोअरला सर्वोत्कृष्ट डेकोर इंटरनॅशनल डिझाइनचा पुरस्कारही मिळाला.
(instagram)ट्विंकलच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर सेलिब्रिटी नेटवर्थनुसार तिची एकूण संपत्ती २५० कोटी रुपये आहे. ही रक्कम खूप मोठी आहे.
(instagram)विशेष म्हणजे ट्विंकल जरी अक्षयची पत्नी असली तरी तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
(instagran)एवढेच नाही तर २०२२ मध्ये ट्विंकल लंडनला मास्टर्सच्या अभ्यासासाठी गेली होती आणि आता तिला मास्टर डिग्री देखील मिळाली आहे.
(instagram)