'स्त्री २' मुळे अक्षय कुमार चर्चेचा विषय बनला आहे. 'स्त्री २' मधील अक्षय कुमारचा कॅमिओ लोकांना खूप आवडला आहे. आता त्याचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चाल तर एक नजर टाकूया अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची यादीवर…
जॉली एलएलबी ३: 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अक्षय कुमारशिवाय या चित्रपटात अर्शद वारसी, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत.
हाऊसफुल्ल ५: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल ५' पुढील वर्षी ६ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, अनिल कपूर आणि नाना पाटेकर देखील दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात चंकी पांडेची भूमिकाही दिसणार आहे.
स्काय फोर्स: 'स्काय फोर्स' हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. आता तो जानेवारी २०२५मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात निम्रत कौर, सारा अली खान आणि वीर पहारिया यांच्या भूमिका आहेत.
शंकरा: अक्षय कुमारचा 'शंकरा' हा वकील आणि राजकारणी चेत्तूर शंकरन नायर यांचा बायोपिक आहे. हा चित्रपट 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अनन्या पांडे आणि आर माधवन दिसणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सिंघम अगेन: अक्षय कुमार दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता, पण 'पुष्पा २'मुळे तो दिवाळीपर्यंत पुढे ढकलला गेला आणि नंतर 'पुष्पा २'ही पुढे ढकलला गेला आहे.
'वेलकम टू जंगल : 'वेलकम टू जंगल' हा विनोदी चित्रपट आहे. 'वेलकम' फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पाटनी, रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच २० डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.