अक्षय कुमारने १९९१ साली आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची नावे सांगत आहोत.
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 2.0 या चित्रपटाने भारतात ४०७.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा एक सायन्स फिक्शन ॲक्शन फिल्म सिनेमा आहे. तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.
अक्षय कुमारचा हाऊसफुल ४ हा कॉमेडी चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात चंकी पांडे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी सारखे कलाकारही दिसले होते. या चित्रपटाने भारतात २१०.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
अक्षय कुमारचा गुड न्यूज हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत करीना कपूर दिसली होती. या चित्रपटाने भारतात २०५.०९ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.
अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २०३.०८ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाने भारतात १९५.५५ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.