(3 / 5)ट्विंकल खन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक बुमरँग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल हातात कॉफीचा मग धरून डोळे मिचकावताना दिसली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहता, ती कसल्याशा तरी गोंधळात असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही ५० वर्षांचे असता आणि तुमची मासिक पाळी चुकते, तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडतो की, ही रजोनिवृत्ती आहे की, गर्भधारणा?’