सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची हवा पाहायला मिळते. अनेक कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्यास सज्ज झाली आहेत. अशातच अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
न्यासा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फिरतानाचे किंवा फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
या फोटोंमध्ये न्यासाने सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर साजेशी ज्वेलरी घातली आहे.