श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला दरवर्षी अजा एकादशीव्रत केले जाते. यावर्षी आज अजा एकादशीचे व्रत गुरुवार, २० ऑगस्ट २०२४ रोजी केले जात आहे.
अजा एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. अजा एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा त्याच्यावर सदैव असते.
अजा एकादशीला शास्त्रांमध्ये काही विशेष काम करण्याचे महत्व सांगण्याच आले आहे. अजा एकादशीच्या दिवशी हे सर्व उपाय केल्याने साधकाचे सर्व वाईट कर्म दूर होऊन धनवृद्धी होते. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणते निश्चित उपाय करणे शुभ ठरेल.
अजा एकादशीच्या दिवशी वैवाहिक सुखासाठी तुळशीच्या झाडाची पूजा करणे शुभ असते. यासोबतच तुम्ही या दिवशी तुळशी मातेजवळ सौभाग्याच्या वस्तू अर्पण करू शकतात. यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते.
अजा एकादशीच्या दिवशी एक नाणे, फुले, अक्षदा भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर त्यांना लाल कापडात बांधून आपल्या ऑफिसमध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळेल आणि तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल.
अपत्य प्राप्तीच्या आनंदासाठी :
अपत्य प्राप्तीच्या आनंदापासून वंचित असाल तर अजा एकादशीच्या दिवशी बालकृष्णाच्या मंत्राचा जप करा आणि विधीनुसार गोपाळ आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करा. परिणामी, लवकरच संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल.