Aishwarya Sharma Faint On Stage: ऐश्वर्या शर्माला तातडीने व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही तास विश्रांती घेतल्यानंतर अभिनेत्रीच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
(1 / 5)
टीव्ही शो 'गम है किसी के प्यार में' आणि ‘बिग बॉस १७’ची स्पर्धक ऐश्वर्या शर्मा मुंबईत होळीच्या कार्यक्रमानिमित्त अभिनेत्री पती नील भट्टसोबत डान्स परफॉर्मन्स करणार होती. दोघांचा डान्स पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. पण, त्याआधीच अभिनेत्रीची प्रकृती बिघडली.
(2 / 5)
मात्र, डान्स रिहर्सल दरम्यान ऐश्वर्या शर्मा स्टेजवरच बेशुद्ध पडली. झूमच्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या शर्मा मुंबईत होळीच्या कार्यक्रमानिमित्त डान्स परफॉर्मन्ससाठी रिहर्सल करत होती. त्यानंतर ती स्टेजवर डान्स करताना अचानक बेशुद्ध पडली.
(3 / 5)
कमी रक्तदाबामुळे अभिनेत्री बेशुद्ध पडली होती. त्यावेळी ऐश्वर्या तिचा पती नील भट्टसोबत डान्ससाठी रिहर्सल करत होती आणि ती स्टेजवरच बेशुद्ध पडली.
(4 / 5)
यावेळी ऐश्वर्या शर्माला तातडीने व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही तास विश्रांती घेतल्यानंतर अभिनेत्रीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्यानंतर तिने पुन्हा डान्स रिहर्सल सुरू केल्या.
(5 / 5)
काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी नोव्हेंबर २०२१मध्ये एकमेकांसोबत लग्न केले. या दोघांनी ‘बिग बॉस १७’मध्ये एकत्र प्रवेश केला होता.