ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांविषयी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…
ऐश्वर्या रायचा एन्थिरन हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक तमिळ भाषेतील विज्ञानकथा चित्रपट होता जो हिंदी भाषेतही डब करण्यात आला होता. sacnilk.com नुसार, या चित्रपटाने भारतात १९३ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.
२०६ मध्ये रिलीज झालेल्या धूम २ चित्रपटामध्ये ऐश्वर्या रायसोबत हृतिक रोशन दिसला होता. या चित्रपटाने भारतात ८०.९१ कोटींची कमाई केली होती. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही चित्रपट पाहू शकता.
हृतिक रोशन आणि ऐश्वर्याचा जोधा अकबर हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ५५.९१ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय २००७मध्ये गुरू चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाने ४५.२९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.
शाहरुख खान आणि ऐश्वर्याचा देवदास हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात ४१.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तुम्ही जिओ सिनेमावर चित्रपट पाहू शकता.