PHOTOS: 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
(1 / 7)
७७व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या फिल्म फेस्टीवलला हजेरी लावताना दिसणार आहेत. पण विश्व सुंदरी म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या हजेरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.(AFP)
(2 / 7)
'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी ऐश्वर्या पोहोचली आहे. हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही.(AP)
(3 / 7)
ऐश्वर्याने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्यावर गोल्डन रंगाचे काही वर्क करण्यात आले आहे. मोकळे केस, साजेसे कानातले, न्यूड मेकअपमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर आहे. फाल्गुनी शेन पीकॉकने ऐश्वर्याचा आऊटफिट डिझाईन केला होता.(AP)
(4 / 7)
ऐश्वर्या गेल्या कित्येक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉरिअल पॅरिस या ब्यूटी ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(AFP)
(5 / 7)
ऐश्वर्याच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मधील लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.(AFP)
(6 / 7)
ऐश्वर्याचा नेहमीपेक्षा चांगला लूक, म्हणून आज ती विश्वसुंदरी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.(AFP)
(7 / 7)
हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही.(AFP)