Aishwarya Rai Bachchan Photos : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या सोशल मीडियावर असे आठ फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती बच्चन कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे.
(1 / 8)
ऐश्वर्या रायने तिच्या इंस्टाग्रामवर बच्चन कुटुंबाचे काही मोजकेच फोटो पोस्ट केले आहेत. कधी सासरे अमिताभ बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत, तर कधी अभिषेक आणि जया बच्चन यांच्यासोबत... पण एकूण ३३९ पोस्टपैकी फक्त ८ पोस्ट अशा आहेत, ज्यात ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीय एकत्र दिसत आहेत.
(2 / 8)
ऐश्वर्या रायने २०१८ मध्ये इंस्टाग्रामवर पदार्पण केले. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने बच्चन कुटुंबासोबतचा पहिला फोटो पोस्ट केला होता.
(3 / 8)
त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ऐश्वर्याने पुढची पोस्ट टाकली, जेव्हा तिची मुलगी आराध्याचा सातवा वाढदिवस होता.
(4 / 8)
ऐश्वर्या रायच्या इंस्टावरील हा एकमेव फोटो आहे, ज्यामध्ये ती तिची मेहुणी श्वेता बच्चन नंदासोबत दिसत आहे. हा फोटो आराध्याच्या सातव्या वाढदिवसाचा आहे.
(5 / 8)
या फोटोमध्ये ऐश्वर्या तिची सासू जया बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत पोज देताना दिसत आहे. ज्या दिवशी ऐश्वर्याने हा फोटो पोस्ट केला, त्या दिवशी जयाचा वाढदिवस होता.
(6 / 8)
२०१९च्या या फोटोमध्ये ऐश्वर्या, श्वेता, जया आणि इतर काही महिला दिसत आहेत.
(7 / 8)
२०२०मध्ये, ऐश्वर्याने एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये आराध्या, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना ऐश्वर्याने लिहिले होते की, 'Always'.
(8 / 8)
यानंतर ऐश्वर्याने १२ ऑक्टोबर २०२० रोजी एक फोटो पोस्ट करून अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
(9 / 8)
ऐश्वर्याने २०२१मध्ये हा फोटो पोस्ट केला होता. यानंतर ऐश्वर्याने इन्स्टावर असा कोणताही फोटो पोस्ट केलेला नाही, ज्यामध्ये ती बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत पोज देताना दिसत आहे.