Aishwarya Rai Superhit Movies : ऐश्वर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला तिच्या अशा दहा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना उच्च रेटिंग मिळाले आहे.
(1 / 10)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही, तर तिच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. तिने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऐश्वर्याने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला तिच्या अशा दहा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आयएमडीबीवर उच्च रेटिंग मिळाले आहे.
(2 / 10)
ऐश्वर्याने १९९७मध्ये 'इरुवर' या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासोबत तब्बू, मोहनलाल, प्रकाश राज, कल्पना अय्यर, गौतमी असे कलाकार होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ८.४ रेटिंग मिळाले आहे.
(3 / 10)
सुभाष घई यांचा 'ताल' हा देखील ऐश्वर्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय खन्ना आणि अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.६ रेटिंग मिळाले आहे.
(4 / 10)
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला आहे. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी ऐश्वर्याला दुसऱ्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे.
(5 / 10)
ऐश्वर्या रायचा 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तिच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्यासोबत सलमान खान आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.
(6 / 10)
मणिरत्नम दिग्दर्शित 'गुरु' हा चित्रपट ऐश्वर्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ठरलाच, पण या चित्रपटातील तिची अभिषेक बच्चनसोबतची जोडी खूप पसंत केली गेली. या चित्रपटादरम्यानच दोघेही एकमेकांच्या जवळ आले. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ रेटिंग मिळाली आहे.
(7 / 10)
ऐश्वर्याचा 'जोधा अकबर' हा चित्रपट भारतीय इतिहासातील एका प्रसिद्ध प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी लोकांना खूप आवडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.
(8 / 10)
'पोन्नियन सेल्वन पार्ट १' दिग्दर्शक मणिरत्नमच्या या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनेक मोठे स्टार्स लीड रोलमध्ये होते. त्याच्या पहिल्या भागाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाले आहे आणि दुसऱ्या भागाला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे.
(9 / 10)
'खाकी' या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. राजकुमार संतोषीच्या या चित्रपटाला IMDBवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.
(10 / 10)
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गुजारिश' या चित्रपटात ऐश्वर्यासोबत हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याला आयएमडीबीवर ७.४ रेटिंग मिळाले आहे.
(11 / 10)
ओमंग कुमार दिग्दर्शित 'सरबजीत' या चित्रपटात ऐश्वर्याने दलबीरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणदीप हुड्डाने ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्याला आयएमडीबीवर ७.३ रेटिंग मिळाले आहे.