मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  AIचा वापर होणाऱ्या 'तू भेटशी नव्याने' पहिल्या मालिकेचा मूहुर्त संपन्न, पाहा फोटो

AIचा वापर होणाऱ्या 'तू भेटशी नव्याने' पहिल्या मालिकेचा मूहुर्त संपन्न, पाहा फोटो

Jun 05, 2024 06:38 PM IST
  • twitter
  • twitter
  • 'तू भेटशी नव्याने' या नव्या मालिकेचा मुहूर्त संपन्न झाला असून दणक्यात चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सेटवरील फोटो समोर आले आहेत.
'तू भेटशी नव्याने' मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्याची बातमी समोर येते आहे. सोनी मराठी वाहिनीने 'तू भेटशी नव्याने' मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहे. मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत मुहूर्त पार पडला. मुहूर्ताची पूजा करत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.
share
(1 / 5)

मालिकेच्या चित्रकरणाचा हा पहिला दिवस आणि मुहूर्त शूट च्या वेळी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अन्य कलाकार आणि तंत्रज्ञान उपस्थित होते. सोबतच मालिकेशी जोडले गेलेले अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांचीही  उपस्थिती होती. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर यांनी सेटवर मालिकेच्या मुहूर्त निमित्त पूजा देखील केली. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार यात काही शंका नाही. 
share
(2 / 5)

या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अभिनेता सुबोध भावे हा यापूर्वी निरनिराळे गाजलेले चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्या आहेत.
share
(3 / 5)

शिवानी सोनार हिच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे. आताही  या नव्या व्यक्तिरेखेतील मालिकेवर प्रेक्षक विशेष प्रेम करतील याबाबत शंका नाही. 
share
(4 / 5)

मालिकाविश्वात ए आयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडेल यात शंका नाही.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज