देणाऱ्याचे हात हजारो... १५० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीनं दिली आणखी एक खूषखबर-after giving 150 returns motisons jewellers ltd to declare stock split for the 1st time ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  देणाऱ्याचे हात हजारो... १५० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीनं दिली आणखी एक खूषखबर

देणाऱ्याचे हात हजारो... १५० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीनं दिली आणखी एक खूषखबर

Sep 18, 2024 01:00 PM IST
  • twitter
  • twitter
Motisons Jewellers share : सुमारे अडीच हजार कोटींचं मार्केट कॅप असलेली मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेड ही कंपनी शेअर स्प्लिट करण्याच्या विचारात आहे. नव्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईलच, शिवाय जुन्या गुंतवणूकदारांनाही अनेकार्थांनी हा निर्णय लाभदायी ठरू शकतो.
मोतीसन्स ज्वेलर्स लिमिटेडनं १९ सप्टेंबर २०२४ रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. सध्या १० रुपये अंकित मूल्य (Face Value) असलेल्या कंपनीच्या शेअरचं विभाजन करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर येणार आहे. कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला तशी माहिती दिली आहे.
share
(1 / 5)

मोतीसन्स ज्वेलर्सनं गेल्या पाच वर्षांत ५६.२ टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने (CAGR) नफा कमावला आहे. मात्र, अद्याप कोणताही लाभांश दिलेला नाही.
share
(2 / 5)

मोतीसन्स ज्वेलर्सचा शेअर सातत्यानं वधारत आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत शेअरमध्ये १६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, मागच्या सहा महिन्यात या शेअरनं गुंतवणूकदारांना १०० टक्के नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
share
(3 / 5)

मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात आला होता. आयपीओमध्ये शेअरची किंमत ५२ ते ५५ रुपये अशी निश्चित करण्यात आली होती. हा शेअर बीएसई व एनएसईवर १०० टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला होता. त्यानंतरही तो सातत्यानं वाढत आहे.
share
(4 / 5)

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)
share
(5 / 5)

इतर गॅलरीज