दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकात ५६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ १ गडी गमावून लक्ष्य गाठले.
त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर (२७ जून) अफगाणिस्तान-आफ्रिका सेमी फायनल खेळली गेली. आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आणि अनेक सहज पराभव पत्करावा लागला.
अफगाणिस्तानच्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरण खूपच उदास दिसत होते. उपांत्य फेरीतील पराभवानंतर खेळाडू निराश झाले.
(PTI)टी-20 विश्वचषक २०२४ ची अंतिम फेरी गाठण्याचे अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले. या T20 विश्वचषकात अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी केली. मात्र उपांत्य फेरीत त्यांच्या फलंदाजांनी फ्लॉप शो केला. या पराभवानंतर संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये शोकाचे वातावरण होते.
(PTI)अफगाणिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार राशिद खानसह बाकीचे खेळाडू खूपच निराश झालेले दिसले. खेळाडूंच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. अफगाणिस्तानच्या खेळाडूंचेही डोळे पाणावलेले होते.
(PTI)फजल हक फारुकीने या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी चमकदार कामगिरी केली. त्याने ८ सामन्यात १७ विकेट घेतल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पण तरीही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
(PTI)उपांत्य फेरीत अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली. संपूर्ण संघ ५६ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १ विकेट गमावून सामना जिंकला.
(PTI)या टी-20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने स्पर्धेत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या संघांना पराभवाचा धक्का दिला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाने शरणागती पत्करली. अफगाणिस्तान सुपर ८ च्या ग्रुप १ मध्ये होता. सुपर ८ च्या तीनपैकी २ सामने त्यांनी जिंकले. अफगाणिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.