जिद्दीचा विजय… राजकीय अस्थिरता, युद्धाची भीषणता, सरावासाठी मैदानही नाही, अफगाण संघ आता सेमी फायनल खेळणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जिद्दीचा विजय… राजकीय अस्थिरता, युद्धाची भीषणता, सरावासाठी मैदानही नाही, अफगाण संघ आता सेमी फायनल खेळणार

जिद्दीचा विजय… राजकीय अस्थिरता, युद्धाची भीषणता, सरावासाठी मैदानही नाही, अफगाण संघ आता सेमी फायनल खेळणार

जिद्दीचा विजय… राजकीय अस्थिरता, युद्धाची भीषणता, सरावासाठी मैदानही नाही, अफगाण संघ आता सेमी फायनल खेळणार

Published Jun 25, 2024 03:40 PM IST
  • twitter
  • twitter
  • टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यांनी प्रथम न्यूझीलंड, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेशचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. विजयानंतर त्यांच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. त्यांच्या विजयाचा आनंद कॅरेबियन बेट ते काबुल सर्वत्र साजरा होत आहे.
टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८ धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिवाय अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला स्पर्धेतून बाहेर काढले.
twitterfacebook
share
(1 / 7)

किंग्सटाउनच्य अर्नोस व्हॅले ग्राउंडवर झालेला हा सामना अनेक वर्षे स्मरणात राहील. रोलर कोस्टरप्रमाणे चढ-उतारांनी भरलेला सामना कधी बांगलादेशकडे तर कधी अफगाणिस्तानच्या पारड्यात झुकलेला वाटायचा. लो स्कोअरिंग गेम, पावसाचा अडथळा आणि डकवर्थ लुईसचा नियम यामुळे सामन्याचा थरार शेवटपर्यंत टिकून होता.
twitterfacebook
share
(2 / 7)

(ICC)
१८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीन उल हकने तस्किन अहमदची विकेट घेताच स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचे डोळे भरून आले. यानंतर कॅरिबियन बेटांपासून ते काबूलपर्यंतच्या सर्वांना अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे कौतुक वाटत आहे. 
twitterfacebook
share
(3 / 7)

त्याआधी या सामन्यात अफगाणिस्तानची पहिली विकेट ११व्या षटकात पडली. यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी अफगाणिस्तानची धावसंख्या वाढू दिली नाही. अफगाणिस्तानला केवळ ११४ धावाच करता आल्या. या रोमांचक सामन्यात प्रत्येक क्षणी फासे बदलत राहिले पण शेवटी विजय राशिद खानच्या योद्ध्यांच्या नावे झाला. 
twitterfacebook
share
(4 / 7)

राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वत:चे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने अशी कामगिरी करणे खूपच कौतुकास्पद आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

 या रोमांचक सामन्यात प्रत्येक क्षणी फासे बदलत राहिले पण शेवटी विजय राशिद खानच्या योद्ध्यांच्या नावे झाला. आता उपांत्य फेरीत २७ जून रोजी अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

(AFP)
११५ धावांच्या इवल्याशा लक्ष्याचा अफगाण गोलंदाजांनी यशस्वी आणि कौतुकास्पद बचाव केला. अफगाणिस्तानकडून लेगस्पिनर राशिद खानने २३ धावांत ४ तर वेगवान गोलंदाज नवीनुल हकने २६ धावांत ४बळी घेतले. बांगलादेशसाठी लिटन दासने (नाबाद ५४) एकट्याने किल्ला लढवला पण तो अपयशी ठरला. 
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज