मुख्यमंत्री सतत दिल्लीला जातात. दिल्लीला जाऊन ते काहीतरी मागत असतात. सगळं मागून झालं. आता फक्त ठाकरे आडनाव मिळेल का, असे ते विचारत असतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. झारखंडमधून कोळी बांधवांची टोपी घालून कोणी आले नाही ना, अशी खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण वरळीसह मुंबईत अनेक सुधारणा केल्या. सुशोभिकरणाची कामे केली. ऐतिहासिक असलेल्या जांबोरी मैदानासाठी अडीच कोटी खर्च केले. मात्र, या भाजप आणि ४० गद्दारांच्या सरकारने विविध कार्यक्रम घेऊन या मैदानाची वाट लावून टाकली.
शिवसैनिकांना हे सरकार घाबरत आहे. या भीतीमुळेच विविध यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. काही झाले तरी शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना आहे, असे आदित्य ठाकरे
या गद्दारांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. यांचे नवे मित्रच या घोटाळ्यांची माहिती आम्हाला देत होते, असा मोठा दावा आदित्य ठाकरेंनी यावेळी केला. तसेच देशातील वातावरण लोकशाहीसाठी घातक होत चालले आहे. हे सरकार मुंबई विकायला निघाले आहेत. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की गुजरातचे, असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.