गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ या लव्हबर्ड्सची चर्चा रंगली होती. आज या लव्हबर्डसने लग्नातील फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि आदितीलच्या खासगी विविहासोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
आजचा दिवस अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थसाठी एकदम खास आहे. अदितीने लग्नासाठी गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. त्यावर साजेशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये अदिती अतिशय सुंदर दिसत आहे.
दुसरीकडे सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा झब्बा कुर्ता घातला आहे. दोघेही वर आणि वधूच्या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. सोशल मीडियावर दोघांचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
अदितीने लग्नाचे हे खास फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने 'तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि तारा आहेस... एकेकांचे आयुष्यभर सोबती होण्यापासून हसण्यासाठी, कधीही मोठं न होण्यासाठी... शाश्वत प्रेम, प्रकाश आणि जादू मिसेस आणि मिस्टर अदू-सिद्धू' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सिद्धार्थ आणि अदितीने काही जवळच्या मोजक्याच लोकांसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नातील फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.