केस गळणे वाढले की अनेक लोक त्याचे टेन्शन घेतात. तुम्ही स्ट्रेस, तणाव दूर केला तर तुमची अर्धी समस्या कमी होते. तसेच केस गळणे थांबवण्याचे नैसर्गिक मार्ग येथे जाणून घ्या.
ग्रीन टी केवळ केस गळणे थांबवत नाही तर केसांच्या वाढीस देखील प्रोत्साहन देते. काही दिवसांच्या वापराने चांगले परिणाम मिळतील. दिवसातून एक कप ग्रीन टी प्या. हे तुम्हाला कमी वेळेत चांगले रिझल्ट देईल.
आवळा हा रामबाण औषध म्हणून ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी पर्याय म्हणून काम करते. त्यातील अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा कमी करण्याचे काम करतात. आवळा नियमित खा. त्याचा रस डोक्यावर लावल्याने अधिक परिणाम होतो.
कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. हे केसांसाठी खूप चांगले आहे. केसांची मुळे मजबूत करण्याचे काम करते. हे डोक्यातील कोंडा दूर करते. रोज कांद्याचा रस डोक्यावर लावल्याने हा त्रास कमी होतो.
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. केसगळती रोखण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. त्यात अँटी बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे केसांच्या मुळांना मऊ करते. कोंडा दूर करून पोषण करते. परिणामी केस अधिक दाट आणि मजबूत होतात. केस गळणे कमी होते.
केस गळती रोखण्यातही पालक खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पालकाचा रस रोज सेवन केल्याने केस गळणे थांबते. शिवाय केसांची वाढही होते.
खोबरेल तेल किंवा बदाम तेल गरम करा. नंतर आपल्या बोटांनी टाळूची मालिश करा. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. नियमित वापराने केस गळणे थांबते.