(4 / 4)सुखदा या व्यक्तिरेखविषयी सांगताना मयुरी म्हणाली, मी जवळपास सहा वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करतेय. खरं सांगायचं तर खुप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोच तोच पणा येऊ नये यासाठी माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे. आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखिल पूर्ण होतेय. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेलच.