मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने तोडलं नातं! हृतिक रोशनशी होतं खास कनेक्शन

साखरपुड्याच्या दीड वर्षांनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने तोडलं नातं! हृतिक रोशनशी होतं खास कनेक्शन

Apr 10, 2024 04:12 PM IST Harshada Bhirvandekar

अगदी दीडच वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने शाही अंदाजात साखरपुडा केला होता. मात्र, साखरपुड्याच्या दीड वर्षानंतर  तिने आता होणाऱ्या नवऱ्यासोबत नातं तोडत दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे.

मनोरंजन विश्वात लग्न आणि साखरपुड्याचे वारे वाहत आहेत. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. एकीकडे लग्नाचे वारे वाहत असताना, आता मात्र एका मराठी अभिनेत्रीने सगळ्यांना एक मोठा धक्का दिला आहे. अगदी दीडच वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने शाही अंदाजात साखरपुडा केला होता. मात्र, साखरपुड्याच्या दीड वर्षानंतर  तिने आता होणाऱ्या नवऱ्यासोबत नातं तोडत दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे. ही अभिनेत्री भाग्यश्री मोटे आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

दीड वर्षांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने शाही अंदाजात साखरपुडा केला होता. तिच्या साखरपुडा सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपला साखरपुडा मोडला असल्याची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने हृतिक रोशनचा मेकअप डिझायनर विजय पालांडे याच्यासोबत साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याची देखील खूप चर्चा रंगली होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

भाग्यश्री आणि विजय यांच्या साखरपुड्याला स्वतः हृतिक रोशन याने देखील हजरे लावली होती. यामुळे या सोहळ्याची चर्चा चाहत्यांसह कलाकारांमध्ये देखील रंगली होती. अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांच्या साखरपुड्याला हृतिकने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत हजेरी लावली होती. त्यामुळे हा साखरपुडा सोहळा चांगला चर्चेत आला होता. विजय पालांडे हा एक मेकअप डिझायनर असून, त्याने हृतिकसाठी अनेक चित्रपटातील लोक डिझाईन केले होते. विजय हा हृतिकचा पर्सनल मेकअप डिझायनर आहे. या दोघांमध्ये व्यवसायिक नाही, तर मैत्रीपूर्ण नातं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

दीड वर्षानंतर भाग्यश्री मोटे हिने आपला साखरपुडा मोडण्याचं सांगितलं आहे. साखरपुडा मोडल्याची बातमी सोशल मीडियातून शेअर केली आहे. या संदर्भात पोस्ट लिहिताना भाग्यश्री म्हणाली की, ‘नमस्कार मित्रांनो! एकमेकांसोबत राहण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र, आता एका चांगल्या आणि वैयक्तिक कारणासाठी मी आणि विजय  जोडीदार म्हणून वेगळे होत आहोत, हे सांगण्यासाठीच मी ही पोस्ट करत आहे. मात्र, इथून पुढेही आम्ही चांगले मित्र राहू. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद!’.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

भाग्यश्री आणि विजय दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. भाग्यश्री मोटे ही विजय पालांडेसोबत अनेकदा फोटो शेअर करायची. तिनेच फोटो शेअर करून आपला साखरपुडा पार पडल्याचे देखील चाहत्यांना सांगितले होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले असताना, असं काय झालं की दीड वर्षानंतर त्यांनी इतका मोठा निर्णय घेत एकमेकांपासून वेगळं होण्याचं ठरवलं. मात्र, हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज