मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Actors In Politics: माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार? ‘धकधक गर्ल’ आधी या कलाकारांनी लढवलीये मुंबईतून निवडणूक!

Actors In Politics: माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार? ‘धकधक गर्ल’ आधी या कलाकारांनी लढवलीये मुंबईतून निवडणूक!

Mar 13, 2024 02:54 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Actors In Politics From Mumbai: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर अद्याप माधुरी दीक्षित हिने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आधी जेव्हा जेव्हा माधुरीला निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने या गोष्टी नाकारल्या होत्या. आता या निमित्ताने मुंबईतून निवडणूक लढवणारे काही कलाकार चर्चेत आले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, यावर अद्याप माधुरी दीक्षित हिने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आधी जेव्हा जेव्हा माधुरीला निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने या गोष्टी नाकारल्या होत्या. आता या निमित्ताने मुंबईतून निवडणूक लढवणारे काही कलाकार चर्चेत आले आहेत.(Instagram )

सुनील दत्त: बलराज दत्त अर्थात सुनील दत्त हे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांनी भारतीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली. १९८४मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले आणि खासदार झाले. सुनील दत्त हे सलग पाच वेळा निवडून आले होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

महेश मांजरेकर: लेखक-दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते अशा सगळ्याच भूमिका अतिशय चोखपणे निभावणाऱ्या महेश मांजरेकर यांनी देखील मुंबईतून निवडणूक लढवली होती. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, आपचे मयंक गांधी आणि मनसेचे चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

उर्मिला मातोंडकर: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तिचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. २०१९मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर हिने लोकसभा  निवडणूक लढवली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

गोविंदा: बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा अर्थात गोविंदा हा मूळचा विरारचा रहिवासी आहे. गोविंदा उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आला होता. त्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इतर गॅलरीज