जायंट सेट, व्हीएफएक्स आणि ग्रीन स्क्रीन यांसारख्या तंत्रज्ञानामुळे चित्रपटांचे बजेट अनेक पटींनी वाढले आहे. याशिवाय कलाकारांचे मानधनही गगनाला भिडले आहे. काही कलाकार तर इतकी फी आकारतात की, त्यांच्या फीमध्येच एखादा चित्रपट बनवणे शक्य आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या एका चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये मानधन घेतो. किंग खानने त्याचे काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याची फी कमी केली होती. पण, गेल्या वर्षी तीन ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तोच इंडस्ट्रीचा खरा राजा आहे.
बॉलिवूडचा भाईजान म्हणजे अभिनेता सलमान खान एका चित्रपटासाठी १०० ते १३० कोटी रुपये घेतो. सलमान खान हा एखाद्या चित्रपटात असेल, तर तो सुपरहिट होण्याची खात्रीच असते. त्यामुळे दिग्दर्शक-निर्मातेही एवढी फी देण्यास तयार असतात.
इंडस्ट्रीचा खिलाडी कुमार म्हणजेह अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही काळापासून वाईट काळातून जात आहे. त्याचे चित्रपट सातत्याने फ्लॉप होत आहेत. अक्षय कुमारची सरासरी फी ८० ते १०० कोटींच्या दरम्यान आहे.
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान त्याच्या चित्रपटांसाठी कोणतेही निश्चित शुल्क आकारण्याऐवजी प्रॉफिट शेअरिंग मॉडेलवर काम करतो. म्हणजेच, तो प्रत्येक करारात एक क्लॉज ठेवतो की, जर चित्रपट हिट झाला, तर त्यातील काही टक्के प्रॉफिट तो स्वत:कडे ठेवेल.
सुपरस्टार रजनीकांत यांची दक्षिण भारतात देवासारखी पूजा केली जाते. चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. रजनीकांत त्यांच्या एका चित्रपटासाठी ६० ते ७० कोटी रुपये घेतात.