Apara Ekadashi 2023 : अपरा एकादशीला करा हे छोटे उपाय, घरी नांदेल सुख आणि समृद्धी
Achala Ekadashi 2023: आज अपरा एकादशीचं व्रत केलं जात आहे. अशात ज्या व्यक्तींना व्यवसाय किंवा नोकरीत भरभराट हवी असेल त्यांनी आज हे सोपे उपायही करावेत.
(1 / 6)
वैशाख महिन्यतलं अपरा एकादशीचं व्रत आज केलं जात आहे. या एकादशीला अचला एकादशी किंवा भद्रकाली एकादशी म्हणूनही ओळखलं जातं.
(2 / 6)
विष्णू पुराणात अपरा एकादशीचं सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे. या दिवशी आपल्या हातून नकळत झालेल्या पापांची भगवान विष्णूंची माफी मागण्यासाठी हे व्रत केलं जातं. या एकादशीच्या महिमामुळे लोक राक्षस योनीपासून मुक्त होऊन स्वर्गात जातात असं म्हटलं जातं. चला जाणून घेऊया अपरा एकादशीचे महत्त्व आणि उपाय.
(3 / 6)
अपरा एकादशीचे महत्त्व : अपरा एकादशीच्या उपवासाने ब्राह्मणहत्या, भूतबाधा, इतरांची बदनामी आदी पापांचा नाश होतो, एवढेच नव्हे तर व्यभिचार, खोटी साक्ष देणे, खोटे बोलणे अशा अनेक पापांपासून अपरा एकादशीचं व्रत मुक्ती देतं. या व्रताच्या प्रभावाने लोकांचे सुख, समृद्धी आणि संपत्ती वाढते.
(4 / 6)
अपरा एकादशीचा उपाय : श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळेच श्रीविष्णूंना अपरा एकादशीला तुळशीची माळ अर्पण करायला विसरू नका. संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली तुपाचा दिवा लावावा. एकादशीला निर्जला व्रत केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलं जातं.(Freepik)
(5 / 6)
अश्वत्थ वृक्षाला धार्मिक शास्त्रात देवतांचे निवासस्थान म्हटले आहे, म्हणून श्री हरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अपरा एकादशीला अश्वत्थ वृक्षाखाली तुपाचा दिवा लावा आणि विष्णुसहस्त्रम् पाठ करा. असे केल्याने गंभीर आजारांपासून मुक्ती मिळते.
(6 / 6)
हळद - नोकरी आणि व्यवसायात सुधारणा व्हावी यासाठी भगवान विष्णूला दोन हळद अर्पण करा. त्यावेळेस ओम केशवाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
इतर गॅलरीज