बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच मानधनासाठी देखील ओळखले जातात. आता सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोणता? चला जाणून घेऊया..
(1 / 7)
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. ते त्यांच्या चित्रपटांमधील भूमिकांप्रमाणेच लग्झरी लाइफमुळे देखील चर्चेत असतात. नुकताच आयएमडीबीचा डेटा समोर आला आहे. त्यामध्ये २०२४ या वर्षात सर्वाधिक मानधन घेण्याऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.
(2 / 7)
सर्वाधिक मानधन हे अभिनेता शाहरुख खान घेतो. तो एका चित्रपटासाठी जवळपास १५० ते २५० कोटी रुपये फी घेत असल्याचे म्हटले जाते.
(3 / 7)
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आहेत. ते एका चित्रपटासाठी जवळपास १५० ते २१० कोटी रुपये घेतात.
(4 / 7)
अभिनेता थलपती विजय हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो एका चित्रपटासाठी १३० ते २०० कोटी रुपये मानधन घेतो.
(5 / 7)
चौथ्या क्रमांकावर अभिनेता प्रभास आहे. तो एका चित्रपटासाठी १०० ते २०० कोटी रुपये माधन घेतो. या यादीमध्ये जवळपास दाक्षिणात्य कलाकारांचा समावेश जास्त आहे.
(6 / 7)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान पाचव्या क्रमांकावर आहे. तो १०० ते १७५ कोटी रुपये फी म्हणून घेतो.
(7 / 7)
सहाव्या क्रमांकावर बॉलिवूडचा दबंग खान सलमान आहे. तो एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो हे देण्यात आलेले नाही.