अमेरिकेत येथे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचा ६ फुटी मेणाचा पुतळा वितळला आहे. वितळल्याने लिंकन यांच्या पुतळ्याचा आकार पूर्णपणे बिघडला आहे. वाशिंगटन डीसीमधील एका प्राथमिक शाळेच्या बाहेर अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा बसवला होता. उष्णतेमुळे लिंकन यांच्या मूर्तीचे शीर वितळले व शरीरापासून वेगळे झाले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाशिंगटन डीसीमध्ये शनिवारी ३८ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मेणाचा पुतळा इतकी उष्णता सहन करू शकला नाही व वितळायला सुरूवात झाली.
या ठिकाणाला लिंकन मेमोरियल नावाने ओळखले जाते. हा पुतळा मेणापासून बनवला होता, जो उष्णतेने वितळला आहे. सर्वात आधी पुतळ्याचे शीर वितळून पडले, त्यानंतर एक पाय वेगळा झाला त्यानंतर दुसरा पाय शरीरापासून वेगळा झाला. ज्या खुर्चीवर लिंकन बसले आहेत. तीही वितळून खाली गेली आहे.
कल्चरल डीसीने सांगितले की, अमेरिकेत सध्या उष्णतेचा प्रकोप सुरू असून अनेक भागातील तापमान ४० डिग्री सेल्सिअस पार झाले आहे. लिंकन यांच्या पुतळ्यावर उष्णतेचा प्रभाव पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या अनेक भागात यंदा उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात ली आहे. अमेरिकन नागरिक गेल्या अनेक दशकातील सर्वाधिक उष्णतेची लाट यंदा अनुभवत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हे मेमोरियल कँप बार्कर या ठिकाणी आहे, जे सिविल वॉरच्या काळात दौर का रिफ्यूजी कँप होते. येथे आधी आफ्रीकी-अमेरिकी लोक शरणार्थी होते. आता या ठिकाणी एलिमेंट्री स्कूल आहे. हे पहिल्यांदाच घडले नाही की, पुतळा वितळला आहे. या मूर्ती अनेकदा मेणबत्तींचे कामही करतात. याच्या आधीच्या पुतळ्यात जवळपास १०० मेणबत्ती होत्या. ज्या पेटवल्यानंतर पुतळा वितळला होता.
नवीन पुतळा फेब्रुवारी २०२४ मध्ये लावण्यात आला होता. यामध्ये थोड्या कमी मेणबत्ती आहेत. त्याचबरोबर पुतळ्याच्या खाली लिहिले आहे की, मेणबत्त्या पेटवल्यानंतर १ ते २ मिनिटात त्या विझवा. या आठवड्यात डीसी-मेट्रो भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. या संपूर्ण महिन्यात तापमान वाढलेले आहे. पुतळ्याचे शीर या आठवड्याच्या अखेरपर्यंत पुन्हा जोडले जाईल.
लिंकन यांचा हा पुतळा अमेरिकी कलाकार सँडी विलियम्स IV यांनी बनवला होता. हा पुतळा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात नॉर्थवेस्ट वाशिंगटनमधील एका शाळेच्या बाहेर बसवला होता. पुतळा स्थापित करणाऱ्या संघटनेने सांगितले की, उष्णतेने पुतळा वितळायला सुरुवात झाल्यानंतर लिंकन यांचे शीर तुटून पडण्यापासून वाचवण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी काढून बाजुला ठेवला आहे. आता पुतळ्याचे डोके दुरुस्त केले जात आहे.